धारावी येथे संविधान दिनानिमित वाहिली श्रद्धांजली
मुंबई, दि २६
भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण या भारतात खंबीरपणे उभे आहोत. संविधानाने दिलेल्या ताकदीमुळे आज आपण आमदार खासदार मंत्री निवडून देतो आणि त्यांना लोकसभेत पाठवतो. संविधान आणि लोकशाही ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपली न्यायव्यवस्था देखील संविधानावरती चावल्यामुळे असल्याने बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलेल्या दूरदृष्टीमुळे आज आपले न्यायव्यवस्था त्यावर चालत आहे. असे जाहीर प्रतिपादन माजी आमदार बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला सविधान महत्व पटवून देताना दिले. श्री. अनिल कासारे यांनी संविधानाची उद्देशिकेचे वाचन केले. अत्यंत कमी वेळात समाज बांधवांना एकत्र आणून संविधान दिनाच्या औचित्य व २६ नोव्हेंबर मध्ये लढता लढता वीर झालेल्या शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार समाजाचे मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून उद्देशिकेचे प्रती आणि शहिदाचे छायाचित्र प्रति उपस्थित नागरिकांना मोफत वाटप केल्या. या कामी श्री. शंकर बळी, सुनील पवार,विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मध्ये वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.KK/ML/MS