पाणी टाकीवर क्लोरिन सिलेंडर मधून गळती, एका नागरिकाचा मृत्यू
वसई दि २६ : पालघर जिल्ह्यातल्या वसई पश्चिमेकडील दिवाणमान स्मशानभूमी जवळील वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी टाकीवर मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या

जाणाऱ्या क्लोरिन सिलेंडर मधून गॅस गळती होऊन मोठा अपघात घडला. या घटनेत बाधा होऊन एका 59 वर्षीय देव पारडीवाला नागरिकाचा हॉस्पिटल मध्ये नेताना मृत्यू झाला आहे. तर या रासायनिक वायुचा गंभीर परिणाम जवळपासच्या अनेक नागरिकांवर आणि मनपा कर्मचाऱ्यांवर झाला.

सध्या वसईतील विविध रुग्णालयात 11 नागरिकांवर आणि 6 मनपा कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेत 18 जणांना बाधा झाली. क्लोरिनची गळती झाल्याची माहिती मिळताच

अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. आणि परिसर रिकामा करण्यात आला.ML/ML/MS