केंद्रीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीची बैठक.
दिल्ली, दि २६
दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री .अश्विनी वैष्णवजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थित राहून रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विविध मागण्या केल्या.

🔹घाटकोपर परिसरातील वाढती गर्दी पाहता विद्याविहारहून कसारा–कर्जत दिशेला दर १५ मिनिटांनी उपनगरीय ट्रेन सोडाव्यात.
🔹मुंबई ते अयोध्या जाणाऱ्या ट्रेन्समध्ये वाढाव्यात
🔹ईशान्य मुंबई आणि बीकेसी वाहतूक सुविधा वाढावी
🔹चालुक्य एक्सप्रेस तेनकसी–शेनकोट्टईपर्यंत वाढवावी.
🔹नवी मुंबई–तिरुनेलवेली (कोकण मार्ग) विशेष रेल्वे सुरू करावी.
🔹मुंबई विमानतळाला उपनगरीय रेल्वेने जोडणी द्यावी.
🔹वाढत्या प्रवासी ताणामुळे महिलांसाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवावी.
🔹मुंबई–शिर्डी गाडी दररोज सुरू करावी.
🔹५ वर्षांपासून बंद असलेली रत्नागिरी–दादर ट्रेन पुन्हा सुरू करावी.

🔹विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुपरफास्ट गाड्यांना महत्त्वाच्या लहान स्थानकांवर थांबे द्यावेत.
🔹अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवावी.
🔹कन्याकुमारी एक्सप्रेस CSMT येथून सुरू करावी.
🔹प्लॅटफॉर्मची गर्दी वाढवणारे नवीन स्टॉल देऊ नयेत.
🔹मुंबई–चेन्नई एक्सप्रेस तिरुनेलवेलीपर्यंत वाढवावी.
🔹धार्मिक स्थळांपर्यंत जाणाऱ्या ट्रेन चालू कराव्यात.

🔹दक्षिण भारत–मुंबई जोडणी मजबूत करण्यासाठी वंदे भारत व AC सुपरफास्ट गाड्या सुरू कराव्यात.ML/ML/MS