संविधान गौरव दिन पुरस्कार सन्मान सोहळा,
पुणे, दि २५: महाराजा अग्रेसन फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने संविधान गौरव दिन पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बॉपोडी, पुणे येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संविधान गौरव दिन पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. सामाजिक कार्य, शिक्षण, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण, साहित्य, उद्योग क्षेत्र इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कार्यक्रमात गीत गायनाचा विशेष कार्यक्रम असून, महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक मा. राहुल शिंदे आणि पार्टी यांचे सादरीकरण उपस्थितांना साद घालणार आहे.
कार्यक्रमाचे धुरंधर पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे,यांच्या हस्ते पुरस्कार दिल जाणार आहे.
मा. सोमय्या मुंडे (IPS) – उपायुक्त, पुणे पोलीस परिमंडळ -४
मा. रमेश बागवे – मा.गृहराज्यमंत्री महाराष्ट्र सरकार
मा. जयदेव गायकवाड– मा.आमदार महाराष्ट्र सरकार
मा. अरविंद शिंदे – अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
मा. अविनाश साळवे – माजी.विरोधी पक्ष नेते पुणे महानगरपालिका
मा. दत्ताजी बहिरट – मा.नगरसेवक पुणे महानगरपालिका
या उपक्रमात संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक एकता यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन जनसेविका सौ.रेखा संजय अगरवाल यांनी केले असून त्या म्हणाल्या की, “समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”
पुणे शहरात संविधान दिनानिमित्त होणारा हा सन्मान सोहळा समाजातील विविध घटकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करावे, असे महाराजा अग्रसेन फाउंडेशनचे अध्यक्ष संजय उमरावसिंग अगरवाल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
संजय उमरावसिंग अगरवाल
अध्यक्ष,महाराजा अग्रेसन फाउंडेशन, पुणे
मोबाईल नंबर.९३७०८८०४२५ – ९१७५३९०४००
KK/ML/MS