ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घट

 ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घट

वॉशिग्टन डीसी, दि. २४ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं नुकसान झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ट्रम्प यांची नेटवर्थ 1.1 अब्ज डॉलर्सनं घसरण झाली आहे. याचं प्रमुख कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण होय. प्रामुख्यानं बिटकॉईन क्रॅश झाल्यानं ट्रम्प यांना फटका बसला आहे

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार सप्टेंबर 2025 मध्ये 7.3 अब्ज डॉलर्स असलेली त्यांची संपत्ती आता 6.2 अब्ज डॉलर्सवर आली आहे, म्हणजेच तब्बल 1.1 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यामागचं प्रमुख कारण बिटकॉईनसह क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील घसरण आणि त्यांच्या कंपनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुप (TMTG) च्या शेअरमध्ये झालेला मोठा तोटा आहे. गेल्या सहा महिन्यांत TMTG चे शेअर 55% ने घसरले आहेत. ट्रम्प कुटुंबाने स्थापन केलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअल (WLFI) टोकनची किंमतही अर्ध्यावर आली आहे. नोव्हेंबरमध्ये SEC कडे दाखल केलेल्या फायलिंगनुसार TMTG ला तिसऱ्या तिमाहीत 54.8 मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असून बिटकॉईन होल्डिंग्जमध्ये 48 मिलियन डॉलर्सची घट झाली आहे. बिटकॉईनची किंमत ऑक्टोबरमध्ये 125000 डॉलर्सवरून 86174 डॉलर्सपर्यंत घसरल्याने ट्रम्प यांच्या संपत्तीत मोठा फटका बसला आहे.

SL/Ml/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *