बानगंगा तलावाचे नुकसान थांबवा
समाजसेवक संजय शिर्के
मुंबई : गेल्या दोन वर्षापासून वाळकेश्वर इथल्या पुरातन आणि ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या जतन आणि संवर्धनाचे काम जिल्हा नियोजन समिती आणि मुंबई महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु कंत्राटदाराने निष्काळजीपणा बाळगल्यामुळे बाणगंगा तलावाचे नुकसान होत असल्याची तक्रारा प्राप्त झाल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पालिका डी विभागाला त्वरीत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
बाणगंगेचे जतन संवर्धनाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वारंवार हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे निष्काळजी बाळगल्यामुळे जलाशयाचे नुकसान झाले असल्याचे
समाजसेवक संजय शिर्के यांनी छायाचित्र सह एएसआय कार्यालयत तक्रार करून जतन संवर्धनाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याची माहिती दिली होती. एएसआय ने मनपा डी विभागाला पत्र धाडून बाणगंगा जतन दुरुतीचे काम त्वरीत थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सदर कामाची पाहणी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यात यावा असे पालिकेला खडसावले आहे.
दोन वर्षांपूर्वी बाणगंगा जतन संवर्धनाच्या कामात अश्याच प्रकारे कंत्राटदाराने तलावा भोवती असणाऱ्या काळा पाषाणाच्या पायऱ्या तोडण्याचे धाडस केले होते. हिंदू संघटनांनी त्याला विरोध दर्शवून ठेकेदाराच्या माणसांसह पालिका अधिकाऱ्यांना देखील चांगला चोप दिला होता. हिंदू संघटनांचा आक्रमकपणा पाहून मलबारील पोलीस ठाण्याने कंत्रदाराच्या माणसावर गुन्हा दाखल केला होता. तरी देखील पुन्हा अशाच प्रकारची चूक कंत्राटदार वारंवार करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे समाजसेवक संजय शिर्के यांनी सांगितले आहे.KK/ML/MS