न्या.सूर्यकांत यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार ७ देशांचे मुख्य न्यायाधीश
नवी दिल्ली, दि. २२ : न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे सरन्यायाधीश म्हणून सोमवारी (24 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभाला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी समारंभाला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.
भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायमूर्ती त्यांच्या कुटुंबियांसह या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ उद्या 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. पुढील सरन्यायाधीश, न्यायमूर्ती सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ सुमारे 14 महिन्यांचा असेल.
SL/ML/SL