गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे. कामगार नेते, अनिल गणाचार्य
मुंबई, दि २१
मुंबईतील ग्रेनी कामगार हा उध्वस्त झाला असून गिरणी कामगारांना मुंबईतच गरे मिळाली पाहिजे असे जाहीर प्रतिपादन कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त चिंचपोकळी येथे त्यांच्या स्मारका जवळ अभिवादन सभेत केले. ते पुढे म्हणाले गुलाबराव यांचे कार्य प्रेरणादायी होते त्यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगार यांच्यासाठी वेचले. विशेष करून गिरणी कामगारांचा लढा त्यांनी लढविला. आज गिरणी कामगार उध्वस्त झाला असून त्यांच्या घराचा प्रश्न खूप बिकट झाला आहे, अनेक वर्षापासून त्यांना घरासाठी लढा द्यावा लागत आहे. दीड लाख कामगारांनी घरासाठी अर्ज केला होता. परंतु आतापर्यंत फक्त १५,००० घरे देण्यात आली आहे. सर्व सरकारी गिरणी कामगारांना अत्यंत क्रूर वागणूक देत असून गिरणी मालकांना व विकासकाच्या बाजूने निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉम्रेड गुलाबराव हे साने गुरुजींचे शिष्य होते व त्यांच्या प्रेरणेने त्यांनी कष्ट कऱ्यांची सेवा केली. महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला व तलाठ्याच्या नोकरीला लाथ मारून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांनी काँग्रेस नेत्या श्रीमती अरुण असफल्ली यांच्याबरोबर काम केले. गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी हिर हिरीने भाग घेतला. गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्रा चळवळी ते अग्रभागी होते.
कॉम .गुलाबराव हे सर्व कष्टकरी कामगारांचे नेते होते त्यांनी १९५७ व १९६३ दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडणून आले १९६७ आणि ६८ दोन वर्ष मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते होते .१९६७ मध्ये आमदार झाले व १९७१ मध्ये खासदारकी लढविली परंतु पराभूत झाले. त्यांची कारकीर्द त्यांनी यशस्वीपणे लढविली व गोरगरिबांना न्याय मिळवून दिला असल्याची माहिती बेस्ट कामगारांचे नेते व माजी नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी सांगितले.
या अभिवादन सभेमध्ये स्थानिक भाजपा नेते रोहिदास लोखंडे, मनसे नेते अनिल येवले, कम्युनिस्ट पक्षाचे काँ. अशोक कुट्टी, काँ. बाबा सावंत ,कम्युनिस्ट महिला फेडरेशनच्या अध्यक्ष श्रीमती अनुराधा रेड्डी, मुंबई गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष एडवोकेट निंबाळकर, पत्रकार केतन खेडेकर, नसिकेत पानसरे, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य अमर रहे या घोषणेने परिसर दणाणून गेला.KK/ML/MS