कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलटच्या तुकडीचे पदवीदान

 कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलटच्या तुकडीचे पदवीदान

नाशिक दि २१ : भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन अर्थात लष्कराच्या हेलिकॉप्टर पायलटच्या 43 व्या आणि 44 व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ आज नाशिक येथील गांधीनगर लष्करी हवाई तळावर संपन्न झाला कार्यक्रमाला भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे अर्थात सदन कमांडचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन जनरल धीरज सेठ तसेच आर्मी एव्हिएशन स्कूलचे कमांडर मेजर जनरल अभिनय राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

22 आठवड्याच्या कठीण प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या हेलिकॉप्टर पायलट एव्हिएशन कोर्स, तसेच बेसिकली रिमोटली ऑपरेटेड एअरक्राफ्ट अर्थात मानव रहित अवकाश वाहन पायलट ,आदी विविध प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी किंवा विंग्ज प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रशिक्षणामध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या कॅप्टन अजित सिंग, कॅप्टन कुशाल शर्मा आणि परमवीर सिंग शेखावत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणारे पायलट्स लवकरच सीमेवर आणि भारतीय लष्कराच्या सेवेत हवाई तुकडीत सामील होणार आहेत .या पदवी प्रदान कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पायलटनी लष्करी बँडच्या तालावर शानदार संचालन केल्यानंतर एरो मॉडेल शो, चित्ता ,चेतक , ध्रुव आणि रुद्र हेलिकॉप्टरने चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केली .

प्रत्यक्ष युद्ध भूमीवर शत्रू छावणी तसेच युद्धभूमी किंवा अतिरेक्यांच्या ठिकाणावर हेलिकॉप्टर मधून सैनिक आणि शस्त्रास्त्र उतरवून कारवाई मध्ये जखमी झालेल्या सैनिकांना एयर लिफ्ट करून उपचारासाठी युद्धभूमीपासून दूर नेणे. यासारखी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली .विशेष म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात प्रथमच भारतीय सैन्य दलातील रणगाडे तुकडीचा तसेच मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टर्स आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या ड्रोनचा वापर करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश प्रथमच करण्यात आला .पदवी प्रदान कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पायलट्सना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ म्हणाले की पायलट प्रशिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे सक्षम वैमानिक तयार होत आहेत. पूर्वीच्या चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर च्या तुलनेत रुद्र, प्रचंड , अपाची, ध्रुव ही हेलिकॉप्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत.

त्याशिवाय ड्रोन मानव रहित विमान आणि इतर अनेक आधुनिक सामग्रीने आणि तंत्रज्ञानाने भारतीय लष्कर सज्ज आहे .मात्र कोणतेही यंत्र स्वतः युद्ध जिंकू शकत नाही तर या यंत्रा मागचा माणूसही महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य यांचा योग्य मेळ आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पायलट ने आपल्याला मिळालेली पदके अभिमानाने मिरवावीत पण त्याचबरोबर नम्रता आणि जबाबदारी यांचीही सांगड घालावी असे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ म्हणाले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *