“काश्मीर टाईम्स’च्या कार्यालयावर छापा, शस्त्रास्त्र साठा जप्त

 “काश्मीर टाईम्स’च्या कार्यालयावर छापा, शस्त्रास्त्र साठा जप्त

जम्मू, दि. २० : जम्मूमधील ‘काश्मीर टाईम्स’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) ने आज छापा टाकला. या कारवाईत AK रायफलचे काडतूसे, पिस्तुलाच्या गोळ्या आणि ग्रेनेडचे लीव्हर जप्त करण्यात आले. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. SIA ने या वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर नोंदवला असून आरोप आहे की या माध्यमातून देशविरोधी व सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे लेख व सामग्री प्रसारित केली जात होती. तपास अधिकाऱ्यांनी दिवसभर कार्यालयातील कागदपत्रे व साहित्याची तपासणी केली.

‘काश्मीर टाईम्स’च्या व्यवस्थापनाने या छाप्याचा तीव्र निषेध केला असून त्यांनी याला “स्वतंत्र पत्रकारितेला गप्प करण्याचा प्रयत्न” असे म्हटले आहे. कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांच्यावरही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

2020 मध्ये श्रीनगरातील प्रेस एन्क्लेव्हमधील ‘काश्मीर टाईम्स’चे कार्यालय प्रशासनाने सील केले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा या वृत्तपत्रावर कारवाई झाली आहे.

उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “छापे जर घ्यायचे असतील तर निवडक माध्यमांवरच कारवाई होऊ नये. चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, पण पत्रकारितेवर दबाव आणू नये.”

‘काश्मीर टाईम्स’ हे जम्मू-काश्मीरमधील सर्वात जुने व प्रभावी इंग्रजी दैनिक असून याची स्थापना 1954 मध्ये पत्रकार वेद भसीन यांनी केली होती. स्वतंत्र व टीकात्मक पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे हे वृत्तपत्र जम्मू आणि श्रीनगर येथून प्रकाशित होत होते व स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर सखोल लेखन करत आले आहे. 2020 मध्ये श्रीनगरातील प्रेस एन्क्लेव्हमधील कार्यालय प्रशासनाने सील केले होते, तर नोव्हेंबर 2025 मध्ये जम्मूमधील कार्यालयावर स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) ने छापा टाकून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर संपादक अनुराधा भसीन यांनी याला पत्रकारितेला गप्प करण्याचा प्रयत्न म्हटले असून त्यामुळे या वृत्तपत्राभोवती वाद निर्माण झाले आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *