१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही लागणार फिटनेस टेस्ट शुल्क

 १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही लागणार फिटनेस टेस्ट शुल्क

नवी दिल्ली, दि. २० : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता १० वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेली वाहने जास्तीची फी भरतील तर २० वर्षांपेक्षा जुन्या कमर्शियल वाहनांसाठी ही फी तब्बल दहापट वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे जुनी वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

केंद्र सरकारने जुनी आणि सुरक्षित नसलेली वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाहन फिटनेस टेस्ट शुल्कात दहापट वाढ करण्यात आली आहे. तसेच आता १५ नाही, तर १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही हे शुल्क आकारले जाणार आहे.

पूर्वी फक्त १५ वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेल्या जुन्या वाहनांकडून शुल्क आकरले जात होते. पण आता हा वाहनांची ही वयमर्यादा १० वर्षांवर आणली आहे.

केंद्र सरकारने हा बदल तत्काळ लागू करून वाहनांचे वय आणि प्रकारानुसार १० ते १५, १५ ते २० वर्ष, आणि २० वर्षांपेक्षा जास्त अशा तीन प्रकारात विभागले आहे.

यानुसार २० वर्षांपेक्षा जुनी – अवजड कमर्शियल वाहन (ट्रक/बस) – २५ हजार (पूर्वी अडीच हजार), मध्यम कमर्शियल वाहन २० हजार (पूर्वी १ हजार ८००), हलकी वाहने १५ हजार, ऑटोरिक्षा ७ हजार, मोटारसायकल २ हजार (पूर्वी ६००) तर १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वाहनांसाठीही फी वाढवली आहे.

यामध्ये मध्यम/जड कमर्शियल वाहनांसाठी १ हजार रुपये, हलकी वाहने ६०० रुपये आणि मोटरसायकलसाठी ४०० रुपये शुल्क असणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *