‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर 151 कोटी झाडे लावणार
मुंबई, दि, २०: राजकोटस्थित जगातील सर्वात मोठे विनामूल्य वृध्दाश्रम – सद्भावना वृध्दाश्रम – ज्येष्ठ, गरीब आणि आजारी व्यक्तींसाठी सेवा देत आहे. पर्यावरण संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी संस्थेने संपूर्ण भारतभर १५१ कोटी झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची ऐतिहासिक घोषणा सद्भावना वृद्धाश्रमचे विजय दोबारिया यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सुरुवातीच्या टप्प्यात तीन कोटी झाडे महाराष्ट्रात लावण्यात येणार आहेत. दुसऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत, संस्थेने राजकोट–जामनगर रोडवरील रामपर येथे सात ११ मजली इमारतींचा जगातील सर्वात मोठा, पूर्णपणे मोफत सेवा देणारा वृध्दाश्रम कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सद्भावना वृध्दाश्रमतर्फे श्री. हसुभाई नागरेचा आणि श्रीमती उमीबेन राडिया यांच्या परिवाराचा १०८ कोटींच्या उदार दानासाठी सत्कार करण्यात आला.
या दोन भव्य उपक्रमांपैकी, पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबवला जाईल. १५१ कोटी झाडे भारतभर, तर तीन कोटी झाडे महाराष्ट्रात सुरुवातीस लावली जातील. नवीन वृध्दाश्रमाच्या विस्तारामुळे संपूर्ण भारतातील गरजू, निराधार, अपंग, एकाकी आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांसाठी आजीवन मोफत निवास, देखभाल आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. सध्या संस्थेकडे १४०० खोल्यांमध्ये ५००० बेड-रिडन आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असून हे जगातील सर्वात मोठे वृध्दाश्रम मानले जाते.
नवीन कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी लंडनस्थित विनुभाई बछुभाई नागरेचा (हसुभाई नागरेचा आणि उमीबेन राडिया कुटुंब) यांनी १०८ कोटी रुपये दान दिले आहेत.
या उपक्रमाला आध्यात्मिक आणि सामाजिक पाठिंबा देण्यासाठी पूज्य संत मोरारी बापूंची ‘मनस वंदे मातरम्’ रामकथा आचार्य अत्रे मैदान, घाटकोपार येथे शनिवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. कथा दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे मनोरथी (मुख्य यजमान) आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे आमदार श्री. परागभाई किशोरभाई शाह आणि त्यांचा परिवार असणार आहे.
“गेल्या दहा वर्षांत सद्भावना वृध्दाश्रमने १.१० कोटी झाडे लावली आणि त्यांचे संवर्धन केले आहे; यामध्ये ४० लाख संरक्षित झाडे आणि ७० लाख मियावाकी तंत्राने वाढवलेली झाडे आहेत. पुढील काळात आम्ही १५१ कोटी झाडे भारतभर लावून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढती गरज लक्षात घेऊन राजकोटमध्ये सात ११-मजली इमारतींचा अत्याधुनिक वृध्दाश्रम उभारला जात असल्याची माहिती विजयदुबारीया यांनी दिली.
या प्रसंगी श्री हसुभाई नागरेचा, श्रीमती उमीबेन राडिया, श्री. धिरेन्द्र कनाबार आणि श्री. गोविंद भानुशाली हे मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS