चार पायांची कोंबडी तुम्ही पाहिलीत का ?
पुणे दि २० : बातमी आहे चक्क चार पायांच्या कोंबडीची , होय हे 100 टक्के खरे आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे चक्क चार पायांची कोंबडी आढळल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे
शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय असून त्यांच्या चिकन दुकानात दररोज सकाळी बॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येत असतात आणि याच सुमारास त्यांच्या दुकानात अशीच एक चार पायांची कोंबडी आढळल्याने सर्वांनाच याच आश्चर्य वाटलंय, ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करू लागले आहेत.
विशेष म्हणजे या कोंबडीची पूर्ण वाढ झाली असून चारही पाय हे वेगवेगळे आहेत. चारही पायांना स्वतंत्र अशा नख्या असल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जनुकीय बदलामुळे हा प्रकार घडतो, पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती असल्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले असून मी माझ्या पूर्ण नोकरी मध्ये आणि आयुष्यात पहिल्यांदाच अशी चार पाय असलेली कोंबडी पाहिल्याचे त्यांनी सांगितलं.ML/ML/MS