माधुरी दिक्षितच्या वेबसिरिजमध्ये झळकणार हा मराठी अभिनेता
मुंबई, दि. १९ : प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेताही झळकणार आहे. माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर वेब सीरिजचा पहिला टीझर शेअर केला. माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे.
या सीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये. मात्र, ही सीरिज जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितसोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर या सीरिजचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, ‘My Next…Details Soon’
सिद्धार्थच्या या पोस्टवरून चाहत्यांना ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये अभिनेत्याची काय भूमिका असेल हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
SL/ML/SL