बंगळुरुमध्ये ‘स्पेशल 26’ स्टाईल ७ कोटींची लूट
बेंगळुरूमधून आज स्पेशल २६ चित्रपटाच्या स्टाईलने दरोड्याची थरारक घटना घडली आहे. HDFC बँकेच्या एटीएमसाठी पैसे भरून नेणाऱ्या कॅश फाइलिंग वॅनमधून तब्बल 7.11 कोटी रुपये लुटण्यात आले असून कॅश वॅनमधील कर्मचाऱ्यांचेही अज्ञात दरोडेखोरांनी अपहरण केले आहे.
ही घटना सीएमएस कॅश वॅन जेपी नगर शाखेतून पैसे घेऊन बाहेर पडत असताना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा इनोव्हा गाडीत आलेल्या दरोडेखोरांनी कॅश वॅनला अडवले. त्यांनी वॅनच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की ते केंद्रीय कर विभागाचे अधिकारी आहेत आणि कागदपत्रांची तपासणी करण्याची गरज आहे. कर्मचारी काही समजून घेण्याच्या आतच दरोडेखोरांनी त्यांना धमकावून कॅशसह वॅनमधील सर्वांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले.
अपहरणानंतर दरोडेखोरांनी गाडी डेअरी सर्कलच्या दिशेने नेली. तेथे कॅश वॅनमधील कर्मचाऱ्यांना खाली सोडण्यात आले. मात्र त्यानंतर 7.11 कोटी रुपयांची रक्कम घेऊन दरोडेखोर फरार झाले. या घटनेनंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, सुसंगठित टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दक्षिण विभागाच्या पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी विशेष पथके तयार केली आहेत. प्राथमिक चौकशीत ही लूट नीट आखलेल्या योजनेनुसार आणि एका सुसंगठित टोळीने केल्याचा संशय आहे.
SL/ML/SL