पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग

 पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग

नवी दिल्ली, दि. १९ : देशात पहिल्यांदाच इंडियन पिकलबॉल लीग (IPBL) आयोजित केली जाणार आहे. या शहर-आधारित लीगमध्ये पाच संघ सहभागी होतील. ही लीग १ ते ७ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवली जाईल. काल लीगच्या पहिल्या हंगामासाठी पाच फ्रँचायझी संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघांची नावे आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. भारतातील आघाडीचे पिकलबॉल खेळाडू मिहिका यादव आणि अमन पटेल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता टाइम्स ग्रुपने सुरू केलेली आयपीबीएल ही भारतातील एकमेव पिकलबॉल लीग आहे जिला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही लीग इंडियन पिकलबॉल असोसिएशन (आयपीए) द्वारे मान्यताप्राप्त आहे.

शहरातील संघ पहिल्यांदाच पिकलबॉलमध्ये

पिकलबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच, भारतात शहर-आधारित संघ मैदानात उतरले आहेत.

५ संघांची नावे जाहीर

गुरुग्राम कॅपिटल वॉरियर्स
मुंबई स्मॅशर्स
बंगळुरू ब्लास्टर्स
चेन्नई सुपर वॉरियर्स
हैदराबाद रॉयल्स

या लीगमध्ये भारत आणि परदेशातील सर्वोत्तम पिकलबॉल खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळतील. गुरुग्राम पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा लीगमध्ये संघ खेळवत आहे. एम३एम इंडियाचे संचालक पंकज बन्सल म्हणाले, “गुरुग्रामला वेगवान, सामाजिक आणि उत्साही खेळ आवडतात. शहराचा पहिला प्रमुख संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

अदानी ग्रुप ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ म्हणून या लीगमध्ये सामील झाला आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय अदेसरा म्हणाले, “पिकबॉल हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खेळांपैकी एक आहे. ही भागीदारी उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *