चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत तेल टँकरला आग, मोठा अनर्थ टळला

 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत तेल टँकरला आग, मोठा अनर्थ टळला

चंद्रपूर दि १९ :– चंद्रपूर-नागपूर मार्गावरील भद्रावती तहसील कार्यालयाजवळ सोयाबीन तेलाने भरलेल्या टँकरला अचानक आग लागली. टँकरमध्ये सुमारे ४५०० लिटर तेल होते. चालक व सहकारी वेळीच वाहनाबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. माहिती मिळताच भद्रावती पोलिस व नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. टँकर (क्र. एमएच ३४ एम १७९५) आगीत नुकसानग्रस्त झाला असून, अन्य कोणतीही हानी झालेली नाही. टँकर हिंगणघाट येथून चंद्रपूरकडे तेल घेऊन जात असताना हा प्रसंग घडला.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *