भंडाऱ्यात हुडहुडी… पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअस!
भंडारा दि १९ : भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसांपासून १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १५.५ अंशांनी कमी आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे आणि थंडीची लाट येण्याची भीती आहे.

भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात थंडीची लाट येण्याच्या शक्यता वर्तविली आहे. नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देऊन लोकांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, उबदार कपडे वापरा, थंडीच्या संपर्कात येण्यास टाळा, वृद्धांची आणि मुलांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.ML/ML/MS