हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग बांधवांना शिवसेनेने दिल्या व्हील चेअर, वॉकर स्टिक
मुंबई, दि. १८
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर, वॉकर आणि वॉकिंग स्टिकचे वितरण बाळासाहेब ठाकरे यांच्या रिगल सिनेमा येथील स्मृतीस्थळासमोर करण्यात आले.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या वंदनीय बाळासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित या उपक्रमाचे आयोजन माझ्या हातातून घडले यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते. यापुढे देखील मी दिव्यांग बांधवांसाठी अशाच प्रकारचे सामाजिक लोकोपयोगी कार्य करत राहणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्त्या सुशिबेन शाह यांनी या कार्यक्रमात दिली.
सुशीबन शहा यांनी फर्स्ट तत्य कार्यक्रम राबवला असून त्याची दिव्यांग बांधवांना फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. खरोखरच या व्हील चेअरचे दिव्यांग बांधवांना फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. तसेच वयोवृद्ध नागरिकांना वॉकर आणि वॉकर स्टिक दिल्यामुळे त्यांच्या जीवनात खरच एक शारीरिक आणि मानसिक आधार आला असल्याची माहिती शिवसेना मुंबादेवी विधानसभा प्रमुख रुपेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमात कुलाबा पोलिस स्थानकातील गेटवे ऑफ इंडिया येथील बीट चौकीसाठी २ व्हीलचेअर पोलिस अधिकारी श्री. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खासदार मिलिंद देवरा, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, कुलाबा विधानसभा संघटक दीपक पवार, कुलाबा विभागप्रमुख गणेश सानप, मलबार हिल विभागप्रमुख प्रविण कोकाटे, महिला विभागप्रमुख सौ. नीलम पवार, सौ. रेखा सुरणकर, प्रिया पाटील उपस्थित होते.KK/ML/MS