बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून जाहीर होणे प्रस्तावित
मुंबई, दि. 18 : राज्यात मुख्यतः पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात लहानग्या मुलांसह अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यानंतर वनविभाग अधिक सतर्कपणे काम करत असून बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग शेतात जाताना जीव मुठीत धरत आहे. गावातील तरुणांचे विवाहही बिबट्यांच्या भीतीमुळे लांबणीवर पडत आहेत. या साऱ्या बाबी लक्षात घेता बिबट्यांचा मानवांवर होणारा हल्ला आता राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. पुढील मंत्रिमंडळाचा बैठकीत असा प्रस्ताव मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या १ल्या शेड्युल मधुन काढू २ऱ्या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात येणार आहे. त्याबरोबर पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी दोन रेस्क्यू सेंटर तातडीने सुरु करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
SL/ML/SL