या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिरावर ध्वजारोहण
अयोध्या, दि. १८ : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद ध्वज फडकवण्यात येणार असून तो, ३ किलोमीटर अंतरावरूनही दिसू शकेल. या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण आता झाली असून . २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांच्यासह बटण दाबून ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमासाठी दुपारी १२ ते १२:३० हा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
बटण दाबल्यानंतर १० सेकंदातच ध्वज हवेत फडकेल. या विशिष्ट भगव्या रंगाच्या ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार (अयोध्येचा राजवृक्ष, ज्याला कचनार असेही म्हणतात) ही चिन्हे आहेत. ही चिन्हे सूर्यवंशाचे प्रतीक आहेत. वैदिक मंत्रोच्चारांमध्ये ध्वजाला वंदन केले जाईल. ध्वज फडकवताना मंदिर परिसरात घंटानाद होईल.
दरम्यान, आज राम मंदिराच्या शिखरावर चाचणी ध्वज फडकवण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचे निरीक्षण करण्यासाठी अयोध्येला भेट दिली.
अहमदाबादमधील कारागिरांनी बनवलेल्या या श्रीराम मंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा ध्वज एका खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिकपासून बनवला आहे. जो सूर्य, पाऊस आणि जोरदार वाऱ्यापासून त्याचे संरक्षण करेल. आर्द्रता आणि तापमानाचे परिणाम कमी करण्यासाठी त्यावर दुहेरी लेपित कृत्रिम थर आहे. या ध्वजावर सूर्यवंश, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे आहेत.
राम मंदिरात पहिल्यांदाच राम-सीता विवाह उत्सव साजरा होत आहे. अंदाजे ८,००० लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यापैकी २५०० लोकांना सामावून घेण्यासाठी तीर्थपुरममध्ये एक तंबू शहर उभारले जात आहे.
SL/ML/SL