मुंबई मेट्रो-3 चे ‘दिव्यांग सवलत आश्वासन’ फसले

 मुंबई मेट्रो-3 चे ‘दिव्यांग सवलत आश्वासन’ फसले

मुंबई, दि. १८ : मुंबई मेट्रो-3 सुरू होऊन दीड महिना होत आला असला, तरी दिव्यांग प्रवाशांसाठी या मार्गिकेचं चित्र आजही बदललेलं नाही. अनेक स्टेशनवर लिफ्ट बंद असल्याने व्हीलचेअरवर असलेल्या दिव्यांगांना प्रवास करणे अक्षरशः अशक्य होत आहे. ‘सुलभ’ प्रवासाच्या नावाखाली दिव्यांगांना रोजच त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दिव्यांग हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मुख्यमंत्र्यांपासून मेट्रो प्रशासनापर्यंत वारंवार पत्रव्यवहार करून सवलती व सुविधा लागू करण्याची मागणी केली. यानंतरच २८ ऑक्टोबर रोजी मेट्रो प्रशासनाने दिव्यांगांसाठी २५% सवलतीची घोषणा केली. तांत्रिक बदल करून ‘दहा दिवसांत सुविधा लागू होईल’ असे मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीरदेखील करण्यात आले.

परंतु आता वीस दिवस उलटले, तरी दिव्यांगांना एकाही तिकिटावर सवलत मिळत नाही. तांत्रिक अडचणी दूर करण्याचं आश्वासन शाब्दिकच राहिलं असून प्रत्यक्षात दिव्यांग प्रवाशांना कोणताही लाभ पोहोचलेला नाही. उलट, लिफ्ट बंद, अपूर्ण सुविधा आणि अडथळ्यांनी भरलेला प्रवास दिव्यांगांसाठी अधिकच कठीण बनला आहे.

मेट्रो प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक, तातडीने आणि जबाबदारीने ही स्थिती सुधारावी, सवलत तत्काळ लागू करावी आणि दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा शंभर टक्के कार्यान्वित कराव्यात अशी कडक मागणी दिव्यांग प्रवाशांतून होत आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *