धुळ्यात हुडहुडी…. सलग दुसऱ्या दिवशी नीचांकी तापमान
धुळे दि १८ – उत्तर भारतातून शीतलहरींमुळे धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 6.2°C अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. हे चालू हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसापासून धुळ्याचे तापमान आठ ते नऊ डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे तापमान चांगलेच घसरले आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून, नागरिक उबदार कपड्यांचा आणि शेकोटीचा आधार घेत आहेत.
Maxi= 28.0°C
Min= 6.2°C
Humi=87
ML/ML/MS