मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार 10 पदरी
मुंबई, दि. १७ : राज्य सरकारने मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी चार नवे लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच सहा पदरी असलेल्या या मार्गाला अतिरिक्त चार लेन मिळाल्यानंतर हा तब्बल 95 किमीचा द्रुतगती मार्ग दहा पदरी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीतील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार असून तो राज्य सरकारसमोर सादर करण्याची तयारी सुरू आहे. सरकारकडून मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर चार नवीन लेन वाढवण्याचे काम 2030 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण होत आला असून, तो येत्या वर्षाच्या सुरुवातीला उद्घाटनासाठी सज्ज होऊ शकतो.
SL/ML/SL