तांत्रिक बिघाडामुळे Maruti ने या मॉडेलच्या ३९ हजार कार मागवल्या परत
मुंबई, दि. 17 : Maruti Suzuki कंपनीने लोकप्रिय ग्रँड SUVचे 39, हजारहून अधिक युनिट्स रिकॉल केले आहेत. रिकॉल म्हणजे या युनिट्समध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून या कारमधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर ग्राहकांना परत दिल्या जातील.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)ने म्हटलं आहे की, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान लाँच करण्यात आलेल्या ग्रँड Vitara SUV मध्ये फ्युल गेज दिसणाऱ्या सिस्टममध्ये काही तांत्रिक बाबी आढळल्या होत्या. कंपनीनुसार, स्पीडोमीटर असेंबलीमध्ये असलेले फ्यूल लेव्हल इंटिकेटर आणि वॉर्निंग लाइट कधीकधी फ्युल लेव्हल किती आहे याचा इंडिकेटर नीट दाखवत नव्हतं. ज्यामुळं वाहन चालकांना टँकमध्ये किती इंधन आहे याबाबत योग्य माहिती मिळत नव्हती. रिकॉलमध्ये ग्रँड विस्ताराचे 39,506 युनिट्सचा समावेश आहे.
\मारुती सुझुकीने म्हटलं आहे की, ज्यांना ही तांत्रिक अडचण आली आहे त्या वाहनांच्या मालकांनी कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत डिलरशी संपर्क करावा. ग्राहकांना त्यांच्या घराजवळ असलेल्या सुझुकी वर्कशॉपमध्ये बोलवण्यात येईल. तिथे टेक्निशियन तपासणी करतील आणि गरज पडल्यास दुरुस्ती करण्यात येईल. दुरुस्तीचा विनाशुल्क असणार आहे. कंपनीने याला प्रिकॉशनेरी स्टेप म्हणत ग्राहकांना वेळीच संपर्क करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन ते सुरक्षित ड्रायव्हिंग करु शकतील.
भारतातील ऑटो कंपन्या गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छिक रिकॉल कोडअंतर्गंत सेफ्टी आणि कॉलिटीबाबत सतर्क झाले आहेत. रिकॉल हा त्याचाच एक भाग आहे.
SL/ML/SL