गायिका मैथिली ठाकूर ११ हजार मताधिक्यांने विजयी
पाटना, दि. १४ : बिहारमधील प्रसिद्ध गायिका मैथली ठाकुरने आपली राजकीय कारकीर्द दणक्यात सुरु केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून मैथिलीने विजय मिळवत अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेत एन्ट्री केली आहे. तिने राजद उमेदवार विनोद मिश्रा यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. पहिल्याच प्रयत्नात आमदारकी पटकावली आहे. विजयी आघाडी घेताच तिने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा जनतेचा विजय आहे. राजकारणात प्रवेश केला असला तरी लोकसेवा हेच माझे ध्येय आहे.” फक्त २५ वर्षांच्या वयात आमदारकी मिळवणाऱ्या मैथिली ठाकूर या बिहारमधील सर्वात तरुण आमदार ठरल्या
अलीनगर हा मिथिला प्रदेशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जिथे राजकीय, सांस्कृतिक आणि जातीय गणिते नेहमीच गुंतागुंतीची असतात. या मतदारसंघात ब्राह्मण, यादव, रविदास आणि अत्यंत मागास जातींची लक्षणीय उपस्थिती आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख उमेदवार ब्राह्मण समाजाचे असले तरी, मैथिली ठाकूर यांची सांस्कृतिक ओळख आणि तरुणाईमधील त्यांची पकड यामुळे मतदारांनी पारंपरिक राजकीय अनुभवाऐवजी एका नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
SL/ML/SL