जगातील Top 10 आळशी देश – भारत कितव्या स्थानी?
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून जगातील सर्वाधिक कमी शारीरिक सक्रियता असलेल्या देशांची यादी जाहीर झाली आहे.
या अभ्यासात विविध देशांतील नागरिक दररोज किती पावले चालतात याची सरासरी मोजण्यात आली. त्यावरून ज्या देशांमध्ये लोक सर्वात कमी चालतात, त्यांना ‘आळशी’ देश म्हणून गणले गेले. या यादीत भारताचाही समावेश असून, तो आठव्या क्रमांकावर आहे.
संशोधनानुसार, इंडोनेशिया हा सर्वात आळशी देश ठरला आहे. इथले नागरिक दररोज सरासरी ३,५३१ पावले चालतात. दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया असून, तेथील लोक दररोज ३,८०७ पावले चालतात. तिसऱ्या स्थानी मलेशिया आहे, जिथे सरासरी ३,९६३ पावले चालली जातात.
यानंतरच्या क्रमवारीत फिलिपिन्स (४,००८), दक्षिण आफ्रिका (४,१०५), कतार (४,१५८), ब्राझील (४,२८९), भारत (४,२९७), इजिप्त (४,३१५) आणि ग्रीस (४,३५०) यांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार भारतातील नागरिक दररोज सरासरी ४,२९७ पावले चालतात, ज्यामुळे भारत जगातील सर्वाधिक आळशी देशांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.
तज्ज्ञांच्या मते, शारीरिक सक्रियता कमी असणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आव्हान आहे. नियमित चालणे, व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली अंगीकारणे हे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक मानले जाते.
या संशोधनातून स्पष्ट होते की भारतासह अनेक देशांमध्ये नागरिकांची शारीरिक सक्रियता कमी असून, यावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.