स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या ४० जणांची स्टार प्रचार पदी नियुक्ती!
मुंबई दि १२ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पैकी नगरपरिषदांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होत असून या पहिल्या टप्प्यासाठी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे अशोक चव्हाण यांच्यासह ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चा पहिला टप्पा म्हणून नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून यासाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारक म्हणून ४० जणांची या प्रचारासाठी नियुक्ती केली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे

१) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
२) रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
३) नितीन गडकरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री
४) शिवप्रकाश जी
५) चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य
६) विनोद तावडे माजी शालेय शिक्षण मंत्री व केंद्रीय निरीक्षक
७) अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार
८) पियुष गोयल केंद्रीय मंत्री
९) नारायण तातू राणे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार
१०) सुधीर मुनगंटीवार माजी वनमंत्री
११) चंद्रकांत दादा पाटील माजी प्रदेशाध्यक्ष तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री
१२) रावसाहेब दानवे पाटील माजी मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष
१३) आशिष शेलार विद्यमान मंत्री
१४) राधाकृष्ण विखे पाटील विद्यमान मंत्री
१५) मुरलीधर मोहोळ विद्यमान केंद्रीय हवाई राज्यमंत्री
१६) पंकजा मुंडे विद्यमान पर्यावरण मंत्री
१७) गिरीश महाजन जलसंपदा मंत्री
१८) गणेश नाईक विद्यमान वनमंत्री
१९) जयकुमार रावळ विद्यमान मंत्री
२०) शिवेंद्रराजे भोसले विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री
२१) नितेश नारायण राणे विद्यमान बंदर विकास मंत्री
२२) जयकुमार गोरे विद्यमान ग्रामविकास मंत्री
२३) मेघना बोर्डीकर विद्यमान ऊर्जा राज्यमंत्री
२४) अमर साबळे
२५) अतुल सावे विद्यमान मंत्री
२६) अशोक उईके
२७) चित्रा वाघ भाजपा विधान परिषद सदस्य
२८) रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री
२९) प्रवीण दरेकर विधान परिषद सदस्य भाजपा गटनेते व मुंबई बँक अध्यक्ष
३०) डॉक्टर भगवान कराड
३१) गोपीचंद पडळकर भाजपा आमदार
३२) डॉक्टर संजय कुटे भाजपा आमदार
३३) अमित साटम भाजपा आमदार
३४) धनंजय महाडिक खासदार कोल्हापूर
३५) एडवोकेट माधवी नाईक
३६) रणधीर सावरकर
३७) अशोक नेते
३८) मंगेश चव्हाण
३९) प्रसाद लाड भाजपा विधान परिषद सदस्य
४०) इद्रिस मुलतानी
या 40 जणांना भाजपाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.ML/ML/MS