मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल….
जालना दि १२ : मुबलक पाणीसाठ्यामुळे यंदा जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस, मूग, सोयाबीन, तूर आणि मका यांसारख्या पिकांचे शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. सततच्या अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडले होते. मात्र, यंदाच्या धुवाधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यासह गोदाकाठच्या परिसरात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळताना दिसत आहेत.ML/ML/MS