बिहार निवडणूकीच्या एक्झिट पोलचा कल NDA च्या बाजूने

 बिहार निवडणूकीच्या एक्झिट पोलचा कल NDA च्या बाजूने

नवी दिल्ली, दि. 11 : बिहार विधानसभेच्या 242 जागांसाठी आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 67.14 टक्के मतदान झाले. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे आणि आता सर्वांनाच निकालाचे वेध लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये निकालाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बिहारमध्ये पुन्हा एकदा दोन एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिटपोलचे कल पाहिले असता एनडीएला 133-159 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर मॅट्रिक्सने 147-167 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एनडीए 138 ते 155 जागा जिंकू शकते, तर महाआघाडीला 82 ते 98 जागा मिळू शकतात. शिवाय, जनसुरज आपले खाते उघडू शकते, परंतु त्यांना दोनपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज नाही. इतरांना तीन ते सात जागा मिळू शकतात. प्रशांत किशोर यांनी अनेक दावे केले होते. जनसुराज पक्षाबाबत प्रशांत किशोर यांचे दावे मतांमध्ये रूपांतरित होताना दिसले नाहीत. निवडणुकीत प्रशातं किशोर यांना जबरदस्त झटका बसला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *