भायखळ्यात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न

 भायखळ्यात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न

मुंबई, दि ११
शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने माझगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेते यशवंत जाधव आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. काही लोक आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर नजर ठेवावी आणि वेळेत त्यांना प्रत्युत्तर देऊन पर्दाफाश करावा, अशी सूचना केली. मतदार यादीवर प्रामुख्याने काम करणे तसेच तळागाळातील सर्व शिवसैनिकांना भेटून अंतर्गत नाराजी दूर करत एकदिलाने काम करावे.भायखळा विधानसभेत शिवसेनेची चांगली ताकद असून महायुतीचे अधिकाधिक शिलेदार महानगरपालिकेत पाठवून भगवा फडकवत ठेवण्याचे आवाहन शिवसेना नेते माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी केले.
आपण आगामी निवडणुकीसाठी भायखळा विधानसभेने कंबर कसली असून सर्व जोमाने तयारीला लागले आहेत. माझे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की आपण तळागाळात जाऊन शिवसैनिकांचे अडीअडचणी समजून घेतला पाहिजे. तसेच त्यांची जी काही कामे असतील ती पूर्ण करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या माजी आमदार यामीनी जाधव यांनी दिले.
यावेळी भायखळा विधानसभा विभागप्रमुख विजयदाऊ लिपारे, महिला विभागप्रमुख सौ. श्रध्दा हुले, महिला विधानसभा प्रमुख सौ. वंदना गवळी, विधानसभा संघटक कृष्णा रेणोसे, उपविभाग प्रमुख देवा कदम, तसेच भायखळा विधानसभेतील सर्व महिला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *