धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुंबई, दि ११
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला..
अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरिफ भाई शेख, माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले, माजी नगरसेविका सुमनताई जाधव, संजय बेडगे, ताजोद्दीन सय्यद, रुक्नोदीन शेख, आलीम शेख, दत्ता राठोड, अमोल सुरवसे, नवलकुमार जाधव, माजी नगराध्यक्षा रेखाताई वसंत बागल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.KK/ML/MS