बिबट्याच्या हल्यावर पिंपरखेडच्या महिलांचा अनोखा जुगाड….
पुणे दि ९ : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सातत्याने होत असताना त्याच परिसरातील महिलांनी यावर एक जुगाड शोधलाय. उत्तर पुणे जिल्हा सध्या बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय.या बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय.
बिबट्याने हल्ला केल्यावर प्रामुख्याने तो मान पकडतो. जर गळयात असे टोकदार खिळे असलेला पट्टा असेल तर यातून आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन या महिलांनी ही अनोखी शक्कल लढवलीय.मागील काही काळात या भागात बिबट्याचे पाळीव प्राण्यासह माणसांवर हल्ले वाढले आहेत.बिबट्याने हल्ला केल्यावर प्राणी अथवा मानवाची मान पकडतो त्यामुळे ही कल्पना सुचल्याचे या महिलांनी सांगितले.ML/ML/MS