शिरोळ इथं ऊस वाहतूक रोखल्यानं आंदोलक आणि कारखाना समर्थकांत झटापट
कोल्हापूर दि ९ : कारखान्यांनी जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नाही, असा पवित्रा
घेत आंदोलन अंकुश संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ
तालुक्यात ऊस दराचं आंदोलन सुरू ठेवलं आहे. शिरोळ येथे कारखान्याकडे वाहतूक करण्यात येत असलेली उसाची वाहने आंदोलकांनी अडवली. यावेळी आंदोलक व कारखाना समर्थक यांच्यात बाचाबाची होऊन जोरदार झटापट झाली.
पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना नोटीस बजावल्या. दरम्यान, आज (रविवार) पासून तालुक्यातील सर्व ऊस तोडी बंद करणार असल्याचेही ‘अंकुश’ने जाहीर केले. यामुळे आंदोलकांना बजावल्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत आणि गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांनी मध्यस्थी करून पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्याशी चर्चा करून पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहण्यास सांगितले.पोलीस ठाण्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर आंदोलकांना नोटीस बजावून पोलिसांनी सोडून दिले.ML/ML/MS