पूर्ण पीठ श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव
कोल्हापूर दि ९ : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात ढगांचा अडथळा नसल्याने श्री दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडला. काल सायंकाळी सूर्य किरणांनी 5 वाजून 5 मिनिटांनी मंदिर द्वारातून प्रवेश करून या सुवर्ण किरणांनी 5 वाजून 42 मिनिटांनी देवीच्या चरणस्पर्श करीत हळूहळू ही सुवर्णकिरणं (05:45 मिनिटांनी) गुडघ्यापर्यंत पोहोचत पुन्हा हळूहळू सुवर्णचरणी 05:47 मिनिटांनी देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.ML/ML/MS