गांधीजींचे सहकारी रेजिनाल्ड रेनॉल्ड्सचे वंशज बेंजामिन हडसन यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी सदिच्छा भेट.

 गांधीजींचे सहकारी रेजिनाल्ड रेनॉल्ड्सचे वंशज बेंजामिन हडसन यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी सदिच्छा भेट.

मुंबई, दि ७
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे जिवलग सहकारी व ब्रिटिश क्वेकर विचारवंत रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईतील टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधीवादी आणि क्वेकर परंपरेतील ऐतिहासिक संवाद, सांस्कृतिक वारसा आणि आजच्या सामाजिक, राजकीय संदर्भातील गांधी विचारांचे पुनर्मूल्यांकन या विषयांवर चर्चा झाली.
“अशा सांस्कृतिक आणि नैतिक देवाणघेवाणीमुळे महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या सार्वत्रिक संदेशाचे पुनरुज्जीवन होते. रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांच्यासारख्या सहकार्‍यांच्या वंशजांच्या भेटीमुळे क्वेकर आणि गांधीवादी विचारसरणीचे वैश्विक बंध मजबूत होतात”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हडसन यांनी आपले पणजोबा रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांच्या महात्मा गांधीजींसोबतच्या ऐतिहासिक नात्याचा उल्लेख करत भारतातील गांधीवादी मूल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
रेनॉल्ड्स हे The White Sahibs in India या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक असून, त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादावर तीव्र टीका करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नैतिक भूमिकेचे समर्थन केले होते. त्यांनी The True Story of Gandhi आणि A Quest for Gandhi यांसारख्या पुस्तकांद्वारे महात्मा गांधींच्या जीवन आणि कार्याचा जागतिक पटावर प्रसार केला होता.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे, डॉ. गजानन देसाई, मोहन तिवारी, सुभाष पाखरे आदी उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *