आयएसबीअँडएम पुणे तर्फे आयोजित ‘एचआर शेअर २०२५’च्या परिषदेत — ‘भविष्यातील कामाचे स्वरूप

 आयएसबीअँडएम पुणे तर्फे आयोजित ‘एचआर शेअर २०२५’च्या परिषदेत — ‘भविष्यातील कामाचे स्वरूप

पुणे, दि ७: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडीया (ISB&M), पुणे तर्फे संस्थेचा वार्षिक भव्य परिषद ‘एचआर शेअर २०२५’ अत्यंत उत्साहात पार पडली . विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार आणि प्रा. राजू धर* यांनी केले.

“Navigating the Future of Work: The Struggle for Space between Technology and People” या विषयावर आधारित या परिषदेत तंत्रज्ञान आणि मानव यांच्यातील नातेसंबंध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सखोल चर्चा झाली.

या दोन दिवसीय परिषदेला ५०० हून अधिक प्रतिनिधी, १०० कॉर्पोरेट डेलीगेट्स आणि ५० पेक्षा अधिक कंपन्या देशभरातून सहभागी झाल्या. उद्घाटन सत्राला सीमेन्स हेल्थिनियर्सचे सीएचआरओ राहुल कुलकर्णी हे प्रमुख अतिथी, तर आदाणी रिअल्टीचे बिझनेस एचआर हेड श्रीकांत पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *