बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात 64.46  टक्के मतदान

 बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात 64.46  टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं.

विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहून बिहारमध्ये बदलाची लाट असल्याचं म्हटलं. बंपर मतदान झालं आहे, अशी माहिती मिळाली आहे. आता पूर्ण बिहारमध्ये बदल होईल आणि महागठबंधनचं सरकार बनेल, अशी आशा असल्याचं मुकेश साहनी म्हणाले.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 150 पेक्षा अधिक जागा जिंकेल किंवा 10 पेक्षा कमी जागा जिंकेल असं वक्तव्य केलं होतं. याशिवाय किशोर यांनी बिहारला तिसरा पर्याय हवा आहे, असंही म्हटलं. बिहार विधानसभेच्या राहिलेल्या 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होईल. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *