हे आहेत देशातील सर्वात दानशूर उद्योजक
मुंबई, दि. ६ : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे उद्योजक भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले तरीही त्यांच्या पेक्षा अधिक दानधर्म करणारे एक उद्योजक आहेत. भारतातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नाडर कुटुंबाने 2025 मध्ये एकूण 2708 कोटी रुपयांचे दान दिले आहे. ते गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती बनले आहेत. ते दररोज सरासरी 7.4 कोटी रुपयांचे दान देतात. शिव नाडर यांची देणगी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढली आहे.
भारतातील टॉप 10 दानशूर व्यक्ती
- शिव नाडर आणि कुटुंब (एचसीएल टेक्नॉलॉजीज)
दान: ₹2708 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, कला आणि संस्कृतीचा विकास - मुकेश अंबानी आणि कुटुंब (रिलायन्स फाउंडेशन)
दान: ₹626 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, ग्रामीण परिवर्तन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, वारसा संवर्धन - बजाज कुटुंब (जमनालाल कनिराम बजाज ट्रस्ट, कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन)
दान: ₹446 कोटी
उद्दिष्ट: ग्रामीण भारतातील सामाजिक-आर्थिक विकास - कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब (आदित्य बिर्ला ग्रुप)
दान: ₹440 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, क्रीडा - गौतम अदानी आणि कुटुंब (अदानी फाउंडेशन)
दान: ₹386 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, कौशल्य विकास, सामुदायिक आरोग्य - नंदन नीलेकाणी
दान: ₹365 कोटी
उद्दिष्ट: सार्वजनिक सेवा नवोपक्रम, सामाजिक परिसंस्था - हिंदुजा कुटुंब (हिंदुजा फाउंडेशन)
दान: ₹298 कोटी
उद्दिष्ट: आरोग्य, शिक्षण - रोहिणी नीलेकणी (एकस्टेप फाउंडेशन)
दान: ₹204 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, सामाजिक विकास - सुधीर आणि समीर मेहता (UNM फाउंडेशन)
दान: ₹189 कोटी
उद्दिष्ट: आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण - सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला (विल्लू पूनावाला फाउंडेशन)
दान: ₹173 कोटी
उद्दिष्ट: शिक्षण, आरोग्य सेवा
SL/ML/SL