सर फिरोजशहा मेहता यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेत अभिवादन
मुंबई, दि ६
सर फिरोजशहा मेहता यांच्या पुण्यतिथीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. संतोष साळुंखे यांनी आज (दिनांक ५ नोव्हेंबर २०२५) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महानगरपालिका उप सचिव श्रीमती विनिता पटवर्धन याप्रसंगी उपस्थित होत्या.