१७ वर्षे विनासुट्टी काम, IT कंपनीने क्षणात काढलं कामावरुन
मुंबई, दि. 5 : Amazon कंपनीतील एका IT इंजिनीअरने 17 वर्षे अविरत मेहनत केली, एकही सुट्टी न घेता कुटुंबासाठी संघर्ष केला. मात्र, AI प्रोजेक्टवर भर देण्याच्या धोरणामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणावर कपात सुरू केली. याचा फटका इंजिनीअरला बसला आणि त्याला नोकरी गमवावी लागली. ज्यामुळे त्याचे जीवन एका क्षणात उलटले. या घटनेने आयटी क्षेत्रातील नोकरीच्या असुरक्षितता समोर आली.
प्लॅटफॉर्म ब्लाइंडवर त्याने आपली व्यथा मांडली. ’17 वर्षे मी कधी ब्रेक नाही घेतला, कुटुंबासाठी झटलो, पण आता रडू आलंय.’, असं त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. कपातीची वृत्त कळताच तो एक तास रडत बसला होता. नंतर पत्नीला कॅफेत बोलावून त्याने सर्व घटना सांगितली. पत्नीने त्याला धीर दिला, ‘ आपण मिळून यातून पुढे जाऊ.’, असे ती म्हणाली. हे पत्र लाटून हजारो लोकांचे डोळे पाणावले.
पत्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आलाय. एका यूजरने म्हटले, ‘राहणीमान साधे ठेवा, नोकरीला आयुष्याशी वरचढ होऊ देऊ नका.’ दुसऱ्याने सांगितले, ‘कपात ही संधी आहे, स्वतःला पुन्हा शोधण्याची.’ तिसऱ्याने म्हटले, ‘अनेक मेहनती कर्मचारी कुटुंबाकडे वेळ देतात, आता तुम्हीही ते करा.’ या प्रतिक्रियांमुळे इंजिनीअरला आधार मिळाला.तसेट आयटी क्षेत्रातील असंख्य लोकांना धीर मिळालाय. आता तो नव्या संधी शोधतोय, ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली आहे.
SL/ML/SL