श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात १ लाख २५ हजार दिव्यांची आरास

 श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात १ लाख २५ हजार दिव्यांची आरास

पुणे दि ५ : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *