वरळी नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे कला प्रदर्शन

 वरळी नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे कला प्रदर्शन

मुंबई, दि ५: वारसा व निसर्गावर आधारित टेक्सचर्स अँड टोन्सची कला प्रदर्शनी वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आली आहे. एकसारख्या व्यावसायिक शिस्तीने कार्य करणारे दोन सर्जनशील कलावंत डॉ. सुलोचना गावडे आणि डॉ. हर्ष ठक्कर, येत्या 5 नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या ‘टेक्स्चर्स अँड टोन्स’ या प्रदर्शनीत आपली कलाकृती सादर करणार आहेत.

वारसा आणि निसर्ग यातील संतुलन अधोरेखित करणारी ही प्रदर्शनी हिमाच्छादित पर्वत, वनरस्ते, प्रवाह, शांत तलाव यांपासून प्राचीन मंदिरे, शिल्पात्मक बस्तर आणि भारतीय वारशाचे प्रतिबिंब दाखवणारे वास्तु घटक अशा विविध दृश्यांचे दर्शन घडवले जाणार आहे. डॉक्टर म्हणून व्यावसायिक जीवनातली नितांत शिस्त आणि कलाकार म्हणून जपलेला सर्जनशील प्रयोग या दोघांच्या प्रदीर्घ अनुभवाचे हे संकलन आहे. डॉ हर्ष ठक्कर हे एक दंत चिकित्सक आहेत तर सुलोचना गावडे ह्यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून पॉलिमर केमिस्ट्री मध्ये डॉक्टर केली आहे.

या प्रदर्शनात डॉ. सुलोचना गावडे सुमारे २० तेलरंग चित्रे सादर करणार आहेत. बलवान ब्रशस्ट्रोक्स, स्तरित पोत आणि तेजस्वी रंगछटा यांच्या सहाय्याने त्या कॅनव्हासला स्मृती, हालचाल आणि सांस्कृतिक संवेदना यांचे रूप देतात. लोककला, वास्तुशिल्प, अध्यात्म व मानवी भावना यांपासून प्रेरणा घेऊन त्या दृश्यांना जिवंत रूप देतात. त्यांच्यासोबत डॉ. हर्ष ठक्कर अंदाजे २५ ते ३० तेलरंग चित्रे सादर करतील. पॅलेट नाइफच्या साहाय्याने स्तरित रंग लावण्याच्या धीम्या, संयमी प्रक्रियेतून तयार झालेल्या या कलाकृतींमध्ये रंगांची खोली आणि पोतांचे स्पंदन लक्षवेधक आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *