आजपासून इस्लामपूर झाले *ईश्वरपूर*, अधिसूचना जारी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’, असे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनाला सादर करण्यात आला होता. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर व नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखरन बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आता निर्णय घेतला आहे. आज केंद्रीय गृहमंत्रालय व महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.”
७० च्या दशकापासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी वारंवार होत होती. इथे झालेल्या एका सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हे इस्लामपूर नाही ईश्वरपूर आहे.’ असे म्हटले होते.
SL/ML/SL