पहिली ते चौथी हिंदी सक्तीच्या निर्णयाला ९०% लोकांचा विरोध
मुंबई, दि. ४ : त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ९० टक्के लोकांचा पहिली ते चौथीच्या विद्यार्थांना हिंदी सक्तीला विरोध असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर केला जाणार आहे. हिंदी ही भाषा पाचवीनंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा, असे राज ठाकरेंनी सुचवल्याचे नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले. डॉ.नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव (भाप्रसे) हेही उपस्थित होते.
आमच्या त्रिभाषा धोरण समितीने असे ठरविले होते की महाराष्ट्रभर जायचे आहे, तीथून माहिती घेतली. नागपूर, नाशिक आणि रत्नागिरीला जाऊन आलो. जनमत समजून घेत आहोत. त्यासाठी आम्ही चार प्रश्न तयार केले आहे. त्यात पर्याय दिले आहेत. आपल्या माध्यामातून हे सांगतो की, ते जास्तीत जास्त लोकांनी भरावी. सर्व राजकिय नेते आंदोलक यांना ही भेटायचे आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला आजची वेळ दिली होती. आम्ही आमची सखोल भुमिका मांडली. त्यांनी त्यांची भुमिका मांडली. समितीने आजवर केलेले पहिली ते चौथी हिंदीची सक्ती असता कामा नये, असे सांगितलंय. हिंदी सक्ती १ ते ४ च्या विद्यार्थांना असू नये, ती ऐच्छिक असावी. असे त्यांचे मत आहे. असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले
SL/ML/SL