जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्वच धोक्यात

 जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्वच धोक्यात

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्व आता धोक्यात आलं आहे. हजारो वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली आहे. लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळले आहे. उल्कापाताच्या आघातातून तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील तिसरं आणि खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्यात असलेल्या अतिक्षारांमुळे कुठलाच जीव या पाण्यात जिवंत राहू शकत नव्हता.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून पावसाचे पाणी आणि शहरातील सांडपाणी थेट लोणार सरोवराच्या पाण्यात मिसळल्याने लोणार धोक्यात आले आहे. लाखो वर्षांपूर्वी अंतराळातून एक मोठा अशनी बुलढाण्यातील लोणारमध्ये येऊन धडकला. यामुळे नैसर्गिकरित्या जगातील अद्वितीय खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार झाले. मात्र या सरोवरातील खाऱ्या पाण्यातील क्षार कमी झाल्याने लोणार सरोवरातील पाण्याचे जैव महत्त्व धोक्यात आले आहे.

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर लोणार येथील मी लोणारकर टीमचे पर्यावरण प्रेमी सचिन कापूरे यांनी थेट लोणार सरोवर गाठून या पाण्याची लिटमस टेस्ट केली. यावेळी पाण्यातील पीएच लेवल सात ते आठच्या दरम्यान असल्याचं निष्पन्न झालं. विशेष म्हणजे यापूर्वी या पाण्याचा पीएच दहापेक्षा अधिक होता.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *