साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी ‘राधा’ या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. केवळ ८३.८ सेमी म्हणजेच २ फूट ८ इंच उंचीची ही म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरली आहे. त्रिंबक बोराटे हे तिचे मालक आहेत. त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला.२४ जानेवारी २०२५ रोजी ‘राधा’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली.
परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर ‘राधा’च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू झाले. यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १२ सप्टेंबर २०२५ ला ‘राधा’ची पाहणी करून अहवाल पाठवला. २० सप्टेंबरला यासाठीची संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यानंतर ‘राधा’ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
SL/ML/SL