मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

 मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

येवला दि.४ :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या ८ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्यात आले. यामध्ये येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, एकलव्य स्मारक,रस्ते काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला शहराध्यक्ष दिपक लोणारी, येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, माजी नगरसेवक राजेश भांडगे, सचिन शिंदे, सुनील शिंदे, सुनील काबरा, रवींद्र जगताप, मलिक मेंबर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, इंजी. अंकुश शिरसाठ, समाधान पगारे, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, सुमित थोरात, सुहास भांबारे, विशाल परदेशी, गाणीच तांबोळी, जावेद लखपती, योगेश तक्ते, संतोष राऊळ, संतोष जगदाळे, बंटी परदेशी, प्रीतम आला शहारे, दिपक पवार, आदित्य कानडे, विजय लोणारी, चव्हाण सर, मंगेश शेलार, सौरभ जगताप, गणेश गवळी, पवन घुले, पंकज भांबारे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

या विकासकामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

बल्हेगांव ता. येवला महाराष्ट्र स्वच्छता अभियान (ना.) २.० अंतर्गत येवला नगरप रिषद घनकचरा व्यवस्थापन करणे कामाचे लोकार्पण (र. रु. १७१.०० लक्ष)

वडगांव ता. येवला येथे येवला नगरपरिषद घनकचरा व्यहवस्थाेपन प्रकल्पु वडगांव येथे बायो मायनिंग प्रक्रिया करणे कामाचे भूमिपूजन (र. रु. २३१.०० लक्ष)

येवला शहरातील अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा अंतर्गत विवेकानंद नगर येथे मोरया किराणा ते धनंजय हिरे यांच्या घरापावेतो रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन(र.रु.१३.०० लक्ष)

येवला शहरातील विवेकानंद नगर येथे श्री अभंग यांचे घर ते श्री श्याम भडांगे यांच्या घरापावेतो रस्ता काँक्रीटीकरण व अंडरग्राउंड गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन(र.रु.१२.०० लक्ष)

येवला शहरातील विवेकानंद नगर गोशाला कंपाउंड मागे सी.स.नं १३/२ येथे वीर एकलव्य स्मारक बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन(र.रु. १३१.०० लक्ष)

येवला शहरातील 60 फुटी रोड ते स.नं 89 ब्रह्मकुमारी पर्यंत रस्ता करणे कामाचे भूमिपूजन(र.रु.२५.०० लक्ष)

येवला शहरातील १०५/६ मधील ओपेन स्पेस विकसित करणे व अनुषंगिक विकास कामे करणे कामाचे भूमिपूजन(र.रु. २५.०० लक्ष)

येवला शहरातील शेख महम्मद करीम ते धीरज चांदणे पावेतो रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन(र.रु.०६.०० लक्ष)

येवला शहरातील काटे मारुती तालीम परिसरात अनुषंगिक कामे व सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.२५.०० लक्ष)

येवला शहरातील बालाजी मंदिर समोरील भागापासून ते गुप्ता हॉटेल पावेतो गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.१०.०० लक्ष)

येवला शहरातील बालाजी मंदिर शेजारील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन(र.रु.१०.०० लक्ष)

येवला शहरातील वल्लभ नगर मधील पुरुष व महिला व्यायाम शाळेला व्यायाम साहित्य पुरविणे कामाचे भूमिपूजन (र.रु.२०.०० लक्ष)

येवला शहरातील वैजापूर रोड वरील अंबिका हॉटेल ते बालमुकुंद जगताप यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.७०.०० लक्ष)

येवला शहरातील साने गुरुजी नगर मध्ये प्रसाद कुलकर्णी यांच्या घरापासून ते ताज पार्क पर्यंत रस्ता करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.४०.०० लक्ष)

येवला शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील श्री राहुल दिंडे यांचे घर ते संतोष आहेर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.१५.००)

येवला शहरातील नागडे रोड स.नं. ५७ येथील रस्या५आह चे कॉक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.५०.०० लक्ष)

संतोषी माता नगर येथे नगरोत्थान योजनेंतर्गत विजय सोनवणे ते प्रसाद निकम घरापर्यंत कॉक्रिट करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. १७.१२ लक्ष).ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *