वेंसर हॉस्पिटलचा गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव उपक्रम

 वेंसर हॉस्पिटलचा गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव उपक्रम

पुणे, दि ३: ऑर्थोपेडिक्स आणि नेत्ररोग या क्षेत्रात विशेष सेवा देणारे बहुविशिष्ट वेंसर हॉस्पिटल यांनी गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव पुनर्वसन उपक्रम सुरू केला आहे. “48 तासांत पहिले पाऊल” या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत सुरक्षितपणे उभे राहणे, चालणे आणि आत्मविश्वासाने घरी परतणे शक्य करतो. हा उपक्रम वेंसर हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असून ऑर्थोपेडिक आणि नर्सिंग टीमच्या समन्वयातून रुग्णांच्या जलद व सुरक्षित पुनर्वसनाचा उद्देश साधला जात आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना वेदनानियंत्रण, श्वसनाचे व्यायाम, टाच हलविण्याचे प्रशिक्षण तसेच घरातील सुरक्षिततेसाठी आवश्यक तयारी याबाबत मार्गदर्शन दिले जाते. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या दिवशी पलंगावर साधे व्यायाम आणि बसण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तर दुसऱ्या दिवशी वॉकरच्या सहाय्याने चालण्यास सुरुवात केली जाते. तिसऱ्या दिवशी जिना चढणे-उतरणे, पलंग, खुर्ची आणि शौचालय यांदरम्यान सुरक्षित हालचाली करण्याचा सराव करून रुग्णाला ‘होम एक्सरसाईज प्लॅन’ दिला जातो. या प्लॅनमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा करता येणारे सोपे व्यायाम समाविष्ट असून काळजीवाहू व्यक्तींनाही रुग्णाच्या काळजीबाबत आणि लक्ष देण्यासारख्या लक्षणांबाबत माहिती दिली जाते.

वेंसर हॉस्पिटलचा फिजिओथेरपी विभाग दररोज बेडसाईड फिजिओथेरपी सत्रे घेतो आणि ठराविक टप्प्यानुसार रुग्णाच्या डिस्चार्जचे नियोजन करतो. याशिवाय मणक्याचे आजार, क्रीडा दुखापती, ज्येष्ठ नागरिकांसाठी संतुलन प्रशिक्षण आणि फ्रॅक्चरनंतरचे पुनर्वसन या सेवाही येथे दिल्या जातात.

वेंसर हॉस्पिटलचे सल्लागार ऑर्थोपेडिक व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. भूषण शितोळे म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमधील रोबोटिक अचूकता तेवढ्याच आत्मविश्वासाने घरी चालण्यात परावर्तित होणे गरजेचे आहे. आमचा ‘48 तासांत पहिले पाऊल’ प्रोटोकॉल शस्त्रक्रिया, वेदनानियंत्रण आणि फिजिओथेरपी यांचा समन्वय साधतो, ज्यामुळे रुग्ण लवकर व सुरक्षितपणे चालू लागतात आणि पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा मिळतो.”

पूर्व प्रशिक्षण वर्ग, रोबोटिक शस्त्रक्रिया, बेडसाईड फिजिओ, पहिली फेरी, जिने चढणे व होम प्लॅन आणि त्यानंतर पहिल्या सहा आठवड्यांपर्यंतच्या फॉलोअप फिजिओ सत्रांद्वारे रुग्णांचा संपूर्ण पुनर्वसन प्रवास पूर्ण होतो.

पिंपरी-चिंचवडमधील वेंसर हॉस्पिटल हे बहुविशिष्ट रुग्णालय असून ऑर्थोपेडिक्स आणि नेत्ररोग या विभागांतील उत्कृष्ट सेवांसाठी ओळखले जाते. रुग्ण-केंद्रीत सेवा, अनुभवी फिजिओथेरपी विभाग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल काळजीमार्ग यांच्या माध्यमातून वेंसर हॉस्पिटल आधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देत आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *