पहिली भारतीय महिला फेरारी रेसर
पुणे, दि. १ : पुण्याची डायना पंडोले पहिली भारतीय महिला म्हणून फेरारीमध्ये इतिहास घडवणार आहे. पुण्यातील 32 वर्षीय रेसर डायना पंडोले आंतरराष्ट्रीय कार रेसिंगच्या विश्वात एक नवीन अध्याय लिहिताना दिसत आहे. फेरारी कार चालवून मध्य पूर्वेकडील फेरारी क्लब चॅलेंजमध्ये (पॅसियोन फेरारी मिडल ईस्ट) भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत असेल. ज्यात दुबई, अबू धाबी, बहरीन, कतार आणि सौदी अरबमधील फॉर्म्युला वन सर्किट्सवर रेस होणार आहे. डायना दोन मुलांची आई आहे. तिच्या यशाने भारतीय मोटरस्पोर्टला जागतिक ओळख मिळणार आहे.
डायना फेरारी 296 चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे. जी कंपनीच्या सर्वाधिक अॅडव्हान्स रेस मॉडेल्सपैकी एक आहे. या 670 हॉर्सपॉवरच्या मशीनला तीक्ष्ण हँडलिंग आणि 250 किमी/तासपेक्षा जास्त वेगासाठी ओळखले जाते. ही कार रोड-गोइंग 296 जीटीबीवर आधारित आहे. याचा पहिला राऊंड 8-9 नोव्हेंबर 2025 ला अबू धाबीच्या यास मरीना सर्किटवर होईल.
डायनाची रेसिंगची सुरुवात 2018 मध्ये जेके टायर वुमन इन मोटरस्पोर्ट प्रोग्रॅमने झाली. सुरुवातीपासूनच तिने अनेक रेसमध्ये सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. ऑगस्ट 2024 मध्ये मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एमआरएफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप – सॅलून कॅटेगरीत तिने विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली.
SL/ML/SL